MPSC Current Affairs - 20 to 24 July, 2020 || चालू घडामोडी –२० ते २४ जुलै २०२० ||

 
Current Affairs - July 22, 2020, All Latest Current Affairs In Marathi 2020 For Preparation of MPSC Exams. Chalu Ghadamodi 2020
Current Affairs - July 24, 2020 || चालू घडामोडी – २४ जुलै २०२० || 

● हैदराबाद विमानतळ येथे भारतातील प्रथमच अशी पूर्णपणे संपर्क-विरहीत विमानतळ कार पार्किंग व्यवस्था सादर केली

● दक्षिण-मध्य रेल्वे क्षेत्राचे ओनगोन उपविभागीय कार्यालय (विजयवाडा विभाग, आंध्रप्रदेश) हे जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने एप्रिल 2020 दिल्या गेलेल्या “वॉटर हीरोज अवॉर्ड”चे विजेता ठरले.

● तेलंगणा राज्यातील पोलीसांनी ‘CybHER’ नावाची आभासी जनजागृती मोहीम राबवविण्यास सुरूवात केली.

● संरक्षण संशोधन व विकास संघटनेने P7 हेवी ड्रॉप’ प्रणाली विकसित केली.

● कुर्मा मोबाइल ॲप भारतीय कासवांचा मागोवा घेण्यासाठी इंडियन टर्टल कॉन्झर्वेशन अॅक्शन नेटवर्क या संस्थेनी तयार केले.

● २३ जुलै हा दिवस राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो.

● जागतिक व्यापार संघटनेने तुर्कमेनिस्तान या देशाला निरिक्षकाचा दर्जा बहाल केला.

Current Affairs - July 23, 2020 || चालू घडामोडी – २3 जुलै २०२० || 

● भारताचे स्वदेशी निर्मितीचे ७०० मेगा वॅट क्षमतेचे काकरापाड अणुऊर्जा संयंत्र (Kakrapad Atomic Power Plant)  3 गुजरात मध्ये तयार करण्यात आले.

● दिनांक १ ऑगस्टपासून "हिंदूस्तान जिंक" (Hindustan_Zinc)  कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) अरूण मिश्रा असतील.

● तामिळनाडू राज्य सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगार राज्य कल्याणकारी मंडळांमध्ये सहभागी होऊ शकतील अशी घोषणा केली.

● जपान मधून मंगळ ग्रहावर  संयुक्त अरब अमिराती देशाने त्यांचे पहिले अंतराळयान पाठवले.

● सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीद्वारे भारताची पहिली स्वदेशी "न्यूमोनिया लस" (Pneumonia vaccine) विकसित केली गेली.

● माहिती चोरण्यास सक्षम असलेल्या मालवेयरचे नाव ब्लॅकरॉक (Blackrock)आहे.

● IIT मद्रासने मेडीकॅब’ नावाचे ‘हाताळण्याजोगे’ रुग्णालय तयार केले.

● तुर्कमेनिस्तानमधील पुढील भारतीय राजदूत म्हणून डॉ. विधू पी. नायर यांना  नियुक्त करण्यात आले.

Current Affairs - July 22, 2020 || चालू घडामोडी – २२  जुलै २०२० || 

●  हिंद महासागरात जुलै महिन्यात आयोजित केलेल्या "अमेरिकेचे नौदल व  भारतीय नौदल" यांच्या सागरी सरावाचे नाव पासएक्स (PassX) आहे .

● विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मानसिक आणि सामाजिक आधार देण्याच्या उद्देशाने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत, मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा नविन उपक्रमाचे नाव "मनोदर्पण" आहे.

● सप्टेंबर २०२० पासून ओव्हरसीज डेव्हलमेंट इन्स्टिट्यूट (Overseas Development Institute) चे नवीन व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) रतन रॉय असतील.

● इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (International Center for Automotive Technology) या संस्थेने "अस्पायर" Aspire नावाने एक ई-संकेतस्थळ कार्यरत केले.

● तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी गटाचा नेता असलेला नूर वाली मेहसूद याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले.

● भारत सरकारने फेरीवाल्यांसाठी सुविधा देण्यासाठी पीएम स्वनिधी मोबाईल ॲप सुरू केले.

● प्रियंका चोप्रा-जोनास हिला टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२० याचे दूत म्हणून नेमणूक करण्यात आली.

● उत्तराखंड सरकार कचर्‍यापासून वीजनिर्मिती करणार आहे.

Current Affairs - July 21 , 2020 || चालू घडामोडी – २१  जुलै २०२० ||

●  अ‍म्फान चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पायाभूत सुविधांची पुनर्रचना करण्यासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने पश्चिम बंगालला ७९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

● CBSE संस्थेनी-आयबीएम संस्थेसोबत  उच्च शालेय अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी करार केला.

● गॅबॉन देशाची पहिली महिला पंतप्रधान म्हणून "रोज क्रिस्टिन ओसौका रॅपोंडा" यांची  निवड करण्यात आली.

● महाराष्ट्राची पहिली महिला निवडणूक आयुक्त "Women Election Commissioner" राहिलेल्या निला सत्यनारायण यांचा कोविड-19 रोगामुळे मृत्यू झाला.

●  गायीचे शेण दोन रूपये किलो दराने खरेदी छत्तीसगड राज्य सरकार गोधन न्याय योजने अंतर्गत करणार आहे.

● केंद्रीय खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्री (Union Minister for Food Processing Industries) हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते कोलासिब, मिझारोम येथे झोरम मेगा फुड पार्क लिमिटेडचे उद्घाटन केले.

Current Affairs - July 20 , 2020 || चालू घडामोडी – २०  जुलै २०२० ||

●  आशियाई विकास बँक (ADB) मध्ये खासगी क्षेत्रातील कामकाज आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी विभागाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून अशोक लवासा यांची नियुक्त करण्यात आली आहे .

●  २०२० सालाचा इन्फ्रा बिझिनेस लीडर ऑफ द इयर (Infra Business Leader of the Year)  हा पुरस्कार वेद प्रकाश दुडेजा यांना देण्यात आला.

●  जगातला सर्वात स्वस्त ठरलेला RT-PCR आधारित ‘कोविड-19 निदान संच’ भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्लीने ‘कोरोशुअर’ या नावाने विकसित केला आहे .

● सचिन अवस्थी यांना ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड २०२० या कार्यक्रमातला “टॉप पब्लिसिस्ट” "Top Publicist" चा पुरस्कार मिळाला.

● अमेरिकेत धोरणात्मक पेट्रोलियम साठा तयार करण्यासाठी भारताने अमेरिकेसोबत सामजंस्य करार केला.

● केंद्र सरकारने २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये एक राष्ट्र एक राशन कार्ड योजना यशस्वीरित्या राबवली आहे.

● २० जुलै रोजी जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो.

Post a Comment

0 Comments