भारताकडे शांघाय सहकार्य संघटना (SCO) राष्ट्रप्रमुखांच्या 19 व्या बैठकीचे यजमानपद


👉👉चालू घडामोडी नोव्हेंबर 2020👈👈🎈🆕🆕

 ◆भारताकडे शांघाय सहकार्य संघटना (SCO) राष्ट्रप्रमुखांच्या 19 व्या बैठकीचे यजमानपद


● 30 नोव्हेंबर 2020 रोजी भारत शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) सदस्य देशांच्या सरकारांच्या प्रमुखांची 19 वी बैठक आयोजित करणार आहे.


● SCOच्या इतर सात सदस्य देशांव्यतिरिक्त चार निरीक्षक देशांचे (अफगाणिस्तान, बेलारूस, इराण आणि मंगोलिया) प्रतिनिधी देखील या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.


●शांघाय सहकार्य संघटना (SCO) विषयी


● शांघाय सहकार्य संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) याची स्थापना 15 जून 2001 रोजी झाली. संघटनेचे मुख्यालय बिजिंग (चीन) येथे आहे. ही एक यूरेशियन राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा युती आहे.


SCO शांघाय सहकार्य संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. चीन हा संघटनेचा संस्थापक देश आहे. *भारताला या संघटनेचे 2017 साली पूर्ण सदस्यत्व मिळाले.

जुलै-सप्टेंबर GDP

●जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताच्या GDP दरात 7.5टक्क्यांची घट


◆ कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, 2020-21 या आर्थिक वर्षांच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) दरात 7.5 टक्क्यांची घट झाली.


◆ चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत GDP दरात 23.9 टक्क्यांची घट झाली होती. मागील तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात आकुंचन झाल्यानंतर लक्षणीय सुधारणा झाली आहे.


◆ स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) विषयी


◆ उत्पादन, उत्पन्न आणि उत्पादन व्यय असे हे तीन प्रवाह राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहाची तीन स्वरूपे आहेत. यांपैकी कोणत्याही स्वरूपातले वर्ष किंवा इतर हव्या असलेल्या कालखंडातला एकूण प्रवाह म्हणजे त्या वर्षातले किंवा कालखंडातले ‘राष्ट्रीय उत्पन्न’ होय.


◆ एकूण राष्ट्रीय उत्पादन दोन घटकांचे बनलेले असते. त्यांपैकी पहिला व अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे देशात उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवाकर्मे, ज्याला ‘स्थूल देशांतर्गत उत्पादन’ (GDP) असे म्हणतात. ‘GDP’मधून भांडवली वस्तूंची झीज वजा केली म्हणजे ‘निव्वळ देशांतर्गत उत्पादन’ (NDP) मिळते. ‘एकूण राष्ट्रीय उत्पादन’चा दुसरा घटक म्हणजे देशातील रहिवाशांना त्यांच्या परदेशांतल्या मालमत्तेवर मिळणारे उत्पन्न वजा परदेशांतल्या रहिवाशांना देशातल्या त्यांच्या मालमत्तेवर मिळणारे उत्पन्न, ज्याला परदेशातून प्राप्त होणारे निव्वळ घटक उत्पन्न असे म्हणतात.


◆ राष्ट्रीय उत्पन्नाची जगातली पहिली परिगणना 1665 साली इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रज्ञ सर विल्यम पेटी यांनी केली.


◆भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची पहिली परिगणना विख्यात नेते आणि अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नवरोजी यांनी 1876 साली 1867-68 या वर्षासाठी केली.


■‘जलीकट्टू’ चित्रपट: 93व्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत भारताकडून नामांकन ■


● “जलीकट्टू” या मल्याळम चित्रपटाला आगामी 93व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकन प्राप्त झाले. यासह 25 एप्रिल 2021 रोजी लॉस एंजेलिस (अमेरिका) येथे पार पडणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात भारताने अधिकृत प्रवेश केला आहे.


ठळक बाबी

●फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या 14 सदस्यांच्या समितीने ‘जलीकट्टू’ चित्रपटाची निवड केली.


●“जलीकट्टू” चित्रपटाचे दिग्दर्शक लिजो जोस पेलिसरी हे आहेत.


●‘जलीकट्टू’ हा चित्रपट केरळच्या पारंपरिक खेळावर आधारित आहे. या खेळाच्या नियमांनुसार बैलाला ठार मारण्यापूर्वी गर्दीत सोडले जाते.


ऑस्कर पुरस्काराविषयी


●"ऑस्कर पुरस्कार" या नावाने ओळखला जाणारा अकादमी पुरस्कार हा अमेरिकेतल्या चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींचा आणि चित्रपटांचा सन्मान करण्यासाठी ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ (AMPAS) तर्फे 24 कलात्मक आणि तांत्रिक पुरस्कार श्रेणींमध्ये दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे. पुरस्काराच्या स्वरुपात विजेत्याला पुतळ्याचे सन्मानचिन्ह (अकॅडेमी अवॉर्ड ऑफ मेरिट) दिले जाते.


● दिनांक 11 मे 1927 रोजी ‘अकॅडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ या संस्थेची स्थापना झाली. प्रथम पुरस्कार सोहळा 1929 साली आयोजित केला गेला होता.Post a Comment

0 Comments