चालू घडामोडी नोव्हेंबर 2020 || Current Affairs November 2020

 👉👉चालू घडामोडी नोव्हेंबर 2020👈👈🎈🆕🆕


🛑 भारताची IRNSS (The Indian Regional Navigation Satellite System) प्रणाली “वर्ल्ड वाइड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम (WWRNS) Word wide redio navigation system” याचा एक घटक बनल आहे.

🔰 हिंद-महासागर प्रदेशात कार्य करण्यासाठी भारताची स्वदेशी बनावटीची GPS प्रणाली ‘इंडियन रीजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (IRNSS)’ याला आंतरराष्ट्रीय समुद्री संघटनेनी (IMO) “वर्ल्ड वाइड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम (WWRNS)” याच्या एका घटकाच्या रूपात स्वीकारले गेलेले  आहे. ही एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.


🔰“वर्ल्ड वाइड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम (WWRNS)” याचा एक घटक बनल्यामुळे ही प्रणाली 50°N अक्षांश, 55°E रेखांश, 5°S अक्षांश आणि 110°E रेखांश, जे भारतीय सीमेपासून अंदाजे 1500 किलोमीटरपर्यंत आहे, एवढ्या क्षेत्रात व्यापलेल्या महासागराच्या जलक्षेत्रामध्ये जहाजांच्या सुचालनामध्ये मदत  करण्यासाठी ठिकाणाची माहिती मिळविण्यासाठी GPS आणि GLONASS प्रणाली प्रमाणेच IRNSS वापरण्यास व्यापारी जहाजांना सक्षम करणार आहे.


🌍भारताची ‘NavIC’ प्रणाली (The Indian Regional Navigation Satellite System) 

(The Indian Regional Navigation Satellite System)

🔰भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)भारतासाठी‘NavIC’ (नॅव्हिगेशन वीथ इंडियन कॉन्स्टीलेशन) नावाने स्वदेशी सुचालन प्रणाली तयार करीत आहे. या प्रणालीच्या उपग्रहांची शृंखला भारताने यशस्वीरीत्या पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित केलेली आहे.


🔰‘NavIC’ प्रणाली ही अमेरिकेच्या ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (GPS) सेवेप्रमाणेच आहे. भारताकडून ‘NavIC’ या नावाने ‘भारतीय प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणाली’ (इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम - IRNSS)’ उभारण्यासाठी एकूण सात उपग्रहांचा वापर केला जात आहे.


🔰IRNSS उपग्रहांना पृथ्वीच्या उप-भौगोलिक समांतर कक्षेत (sub-GTO) प्रस्थापित करण्यात आले आहेत. त्यातला आठवा IRNSS-1H हा खासगी कंपन्यांकडून तयार करण्यात आलेला आणि सक्रियपणे पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आलेला भारताचा पहिला उपग्रह आहे.


🔰IRNSS दोन प्रकारच्या सेवा प्रदान करते - सर्व वापरकर्त्यांसाठी स्टँडर्ड पोजिशनिंग सर्व्हिस (SPS) आणि केवळ अधिकृत वापरकर्त्यांसाठी रेस्ट्रीक्टेड सर्व्हिस (RS).


🔰ही प्रणाली भारताच्या सर्व बाजूंनी सुमारे 1500 किलोमीटरच्या सीमेच्या आत कार्य करते. ही प्रणाली वापरकर्त्या संस्थेला रस्त्यावर आणि समुद्रात त्यांचे वाहन चालविण्यासाठी योजनेची आखणी करण्यास आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करणार. आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडणार्‍या मच्छीमारांना त्याद्वारे सावध केले जाऊ शकते आणि लोकांना त्यांना आवश्यक असलेला पत्ता शोधण्यास मदत होऊ शकणार. शिवाय दूरसंचार आणि पॉवर ग्रीड कार्यामध्येही याची मदत होऊ शकते.

⬛⬛ काही महत्त्वाचे प्रश्न ⬛⬛

● कोणत्या राज्यात रामसार स्थळ म्हणून घोषित झालेले सूर सरोवर आहे?


*उत्तर* : उत्तरप्रदेश


● ‘सामाजिक सुरक्षा संहिता’ कोणत्या मंत्रालयाने जाहीर केली?


*उत्तर* :  कामगार व रोजगार मंत्रालय


● कोरोनामुळे प्रभावित झालेल्या गरीब देशांना मदत करण्यासाठीच्या उद्देशाने जी-20 समूहाने जाहीर केलेल्या कर्ज कराराचे नाव काय आहे?


*उत्तर* : जी20 डेब्ट सर्व्हिस सस्पेंशन इनिशिएटिव्ह


● ‘हनोई घोषणापत्र’ कोणत्या शिखर परिषदेत स्वीकारले गेले?


*उत्तर* : पूर्व आशिया शिखर परिषद 2020


● जॉली ग्रँट विमानतळ कोणत्या शहरात आहे?


*उत्तर* : देहरादून


● राष्ट्रीय पत्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतात?


*उत्तर* : 16 नोव्हेंबर


● जगातल्या पहिल्या ट्राम ग्रंथालयाची स्थापना कोणत्या राज्यात बालकांसाठी करण्यात आली?


*उत्तर* : पश्चिम बंगाल


● अटलांटिक महासागरातले सर्वात मोठे पूर्णपणे संरक्षित सागरी अभयारण्य म्हणून कोणत्या ठिकाणाला घोषित करण्यात आले?


*उत्तर* : ट्रिस्टन डा कुन्ह

Share to all friends ⏭️⏭️⏭️


‘SITMEX-20’: भारत, सिंगापूर आणि थायलँड यांच्या नौदलांच्या दरम्यानची त्रिपक्षी सागरी कवायत


21 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबर 2020 रोजी भारत, सिंगापूर आणि थायलँड यांच्या नौदलांच्या दरम्यान ‘SITMEX-20’ नामक त्रिपक्षी सागरी कवायत आयोजित करण्यात आली होती.


✴️❇️Latest most Important News for Mpsc Exam ठळक बाबी✴️❇️

2020 सालाची ही कवायत सिंगापूर नौदलाने आयोजित केली.


अंदमानच्या समुद्रात ही कवायत आयोजित करण्यात आली होती.


स्वदेशी बनावटीचे ASW कॉर्वेट ‘कामोर्ता’ आणि मिसाईल कॉर्वेट ‘करमुक’ या भारतीय नौदलाच्या जहाजांनी यात भाग घेतला.


ही SITMEX या सागरी कवायत मालिकेची द्वितीय आवृत्ती आहे. भारतीय नौदलाने यजमानपद भूषवलेली पहिली SITMEX कवायत सप्टेंबर 2019 मध्ये पोर्ट ब्लेअर जवळ आयोजित करण्यात आली होती.


तीनही देशांच्या नौदलांमध्ये परस्पर आंतर-परिचालन क्षमता वाढवण्यासाठी आणि सर्वोत्तम पद्धती स्वीकारण्यासाठी SITMEX कवायतीचे आयोजन केले जाते.


सिंगापूर हे आग्नेय आशियातले मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकाला वसलेले एक द्वीपराष्ट्र आहे. सिंगापूर हे एक नगरराज्य असून आग्नेय आशियातले सर्वात छोटे राष्ट्र आहे. सिंगापूर डॉलर हे तेथील राष्ट्रीय चलन आहे.

थायलँड हे आग्नेय आशियातले एक देश आहे. बॅंकॉक ही या देशाची राजधानी आहे. थाई बात हे तेथील राष्ट्रीय चलन आहे.

Post a Comment

0 Comments