Arogya Vibhag Bharti 2021 Exam cance l आरोग्य विभाग भरती 2021परीक्षा रद्द

Arogya Vibhag Exam 2021 Cancel | आरोग्य विभाग भरती 2021परीक्षा रद्द 

Aarogya vibhag recruitment 2022 examination update GR :-(source "Maharashtra time")

       गेल्या वर्षी क्टोबरच्या महिन्यात 21.10.2021 रोजी आणि दि. 31.10.2021 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षा ह्या रद्द करणे बाबत शासनाची मान्यता मिळाली आहे.

Arogya Vibhag Exams 2021 aCancle GR :-

      Maharashtra Arogya Vibhag 2021 Two dates exams has been cancel and Maharashtra government has pass this rejection request of arogya vibhag bahrti 2021 written exam paper.

संपूर्ण माहिती खालील विडिओ मधून समजेल पहा संपूर्ण व्हिडीओ:- Arogya vibhag exam cancelled 2021 watch Video to understand reason.

Arogya Vibhag Bharti 2021 cancle exams and new advertisement will publish soon.

Arogya Vibhag Bharti 2022 Update:-

          Maharashtra aarogya vibhag recruitment 202will be published soon, because Maharashtra aarogya vibhag department declare 21 October 2021 exams paper and 31 october 2021 exams paper of arogya vibhag Bharti has been cancelled and it will be conduct in fresh recruitment in 2022.
    In the recruitment of Maharashtra health department 2022 those candidate has been applied for above exams application they don't need to applied again because in the new letter to cancellations of Maharashtra aarogya vibhag Bharti paper. They have been clear old application of applicant will be acceptable and those  candidate want to apply for Maharashtra health department recruitment 2022 they must submit fresh application with declared exam fees.
Aarogya vibhag Bharti 2022 fash recruitment of Maharashtra health department 2022, if you want to download arogya vibhag Bharti 2021 question paper pdf can download it from this education site just search a blog and download Maharashtra 2021 all exams paper.

MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य (MPSC समन्वय समिती यांच्या करायला यश प्राप्त):-

         आज आरोग्य भरती रद्दचा निर्णय सरकारने आज पत्रकाद्वारे जाहीर केला. हा निर्णय घेण्यासाठी सरकारने अती टाळाटाळ केली, कदाचित सरकार अस्थिर झालंय म्हणूनही आज हा निर्णय जाहीर झालेला दिसतो, परंतु शेवटी आमच्या लढ्याला यश मिळालेच.

आरोग्य भरती सुरू होण्या आधीपासूनच निवड केलेल्या पाच खासगी कंपन्या विरुद्ध आमची मोहीम सुरू होती, आरोग्य भरती घेतलेल्या NYSA या खासगी कंपनीने इतर परीक्षांमध्ये केलेले सर्व गैरप्रकार आम्ही जगजाहीर केले होते. त्याच बरोबर निवड झालेल्या इतर  कंपन्याबाबतही ठोस पुरावे आमच्याकडे होते परंतु आमच्या या कंपनी विरोधाला तेव्हा आम्ही विघ्नसंतोषी आहोत, परीक्षा होऊ देत नाहीत म्हणून विरोध झाला होता, त्या सर्वांना आज सांगू इच्छितो शेवटी विजय सत्याचाच झाला, सर्व घोटाळे यशस्वीरीत्या बाहेर काढल्याने त्या "तथाकथित" टीकाकारांचे थोपडे आम्ही बंद केलेत. 

 सर्वप्रथम आरोग्य भरती गट-ड चा फुटलेला पेपर MPSC समन्वय समितीनेच समोर आणला होता, परीक्षा सुरू असतानाच आम्ही तो पेपर आमच्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केला होता.  राहुल कवठेकर - अध्यक्ष MPSC समन्वय समिती यांनी याची रीतसर तक्रार पुणे सायबर पोलीस स्थानकात केली. तक्रार करतेवेळी एकही सामान्य विद्यार्थी आमच्या सोबत नव्हता, किंवा कोणत्याही पक्षाने, किंवा इतर संघटनेने याविरुद्ध तक्रार करू नये हे आश्चर्यकारक होते. कालांतराने गट-क परीक्षेतील गैरप्रकार सुध्दा बाहेर आला परंतु पुणे सायबर पोलीस FIR करण्यास टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करताच FIR ची नोंद करण्यात आली. पुणे सायबर पोलिसांच्या संपूर्ण टीमने विशेषत IPS भाग्यश्री नवटके मॅडम यांना हा सर्व घोटाळा बाहेर काढत मोठी कामगिरी बजावली, त्या सर्वांचे तमाम स्पर्धा परीक्षार्थीकडून धन्यवाद.

 ही कामे करत असताना MPSC समन्वय समितीच्या कोअर टीमला प्रचंड त्रास सहन करावा लागला, आमच्यावर साम-दाम-दंड-भेद, जी असेल ती निती वापरली गेली. परंतु आमच्या कोअर टीम मधला एकही सदस्य मागे हटला नाही किंवा कोणत्याही अमिषाला बळी पडला नाही. सामान्य विद्यार्थ्याला किंवा लबाड राजनीतिक पक्षाला हे कधीही जमले नसते.  "निर्भिड" हा शब्द कितीही छोटा वाटत असला तरी आम्ही या शब्दासाठी खूप मोठ्या किंमती मोजल्या आहेत, नीतिमत्ता जपत प्रत्येक काम इमानदारीने आणि निर्भिडपणे कले. 

सत्य परिस्थिती ही आहे की आमच्यापैकी कोणीही श्रीमंत नाही किंवा मोठ्या राजकारणी परिवारातला नाही, त्यामुळे कोर्ट केस करताना मुंबई-नागपूर-पुणे-औरंगाबाद आणि संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना आम्हाला मदतीची नितांत गरज होती, आपल्यातील काही सामान्य विद्यार्थांनी तसेच बऱ्याच शिक्षकांनी मोलाची मदत केली त्याबद्दल आभारी आहोत. तसेच साम टीव्ही, टीव्ही ९ मराठी, झी २४ तास, लोकशाही, न्यूज १८ लोकमत, एबीपी माझा, बीबीसी मराठी, लोकसत्ता, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, पुढारी आणि इतर अनेक मीडिया बंधूंनी मोलाची साठी दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार.

यासोबतच MPSC समन्वय समितीच्या जिल्हा कार्यकारिणी राज्यभर रुपयाही न घेता निस्वार्थपणे काम करत आहेत, त्यांच्या मुळेच आपण काही जिल्ह्यात आंदोलने केली, मोर्चे काढले आणि असे इतर अनेक कामे ते करत आहेत, त्या सर्व जिल्हाध्यक्षांचे, सदस्यांचे आजच्या या निर्णयासाठी अभिनंदन. कशाचीही अपेक्षा न करता MPSC समन्वय समिती ही कामे करत आहे, सामान्य विद्यार्थ्यांकडून आमची फक्त एकच अपेक्षा आहे, आमच्या जिल्हा कार्यकारिणीला सपोर्ट करा. आंदोलने, मोर्चे यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा, सोशल मीडिया, ट्विटर मोहीम यामध्ये आपला सहभाग असू द्या. आज फक्त परीक्षा रद्द झाली आहे, आरोग्य भरतीची फेरपरीक्षा ,जिल्हा परिषद, पशुसंवर्धन, MIDC, नवीन तलाठी, पोलीस आणि शिक्षक भरती असे अनेक मुद्दे निकाली काढायचे असल्यास आम्हाला आपल्या सोबतीची नितांत गरज आहे.


!!  सत्यमेव जयते  !!

MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

Post a Comment

0 Comments