बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये बोर्डाकडून घोडचूक, प्रश्नपत्रिकेत सरळ उत्तरे ! विद्यार्थ्यांना मिळणार 6 गुण?

बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये बोर्डाकडून घोडचूक, प्रश्नपत्रिकेत सरळ उत्तरे ! विद्यार्थ्यांना मिळणार 6 गुण?

HSC Maharashtra state Board Exam paper 2023

HSC Maharashtra state Board Exam paper 2023 :- 

बारावीच्या परिक्षेला सुरवात झाली आहे आणि चक्क परीक्षा बोर्ड कडींच मोठी चूक झाली आहे. दिनांक 21/02/2023  मंगळवारी झालेल्या (HSC Board Exam paper Maharashtra 2023) इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चक्क बोर्डानेच विद्यार्थ्यांचे काम सोपे करून टाकले. इंग्रजीच्या या प्रश्नपत्रिकेत चक्क उत्तरेच छापून देण्यात आली आहेत.आता या महा पराक्रम केल्याने विद्यार्थ्यांना फुकटचे 06 गुण दिले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे बोर्डाची ही घोडचुक विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणार की/नुकसान कारक आणि यावर बोर्ड काय निर्णय घेणार आहे यावर अवलंबून आहे.

काय आहे नेमका प्रकार ?

  • मंगळवारी दिनांक 21/02/2023 रोजी १२ वी (HSC EXAM) चा पहिला इंग्रजी विषयाचा पेपर घेण्यात आला आहे. 
  • सदरच्या इंग्रजी विषयासाठी ८० गुणांची प्रश्नपत्रिका परिक्षा बोर्डाकडून तयार करण्यात आली होती 
  • आणि यातील प्रश्न क्रमांक ३ हा कवितेवरील आधारित प्रश्न होता. 
  •  आता या प्रश्नाच्या उपप्रश्नात ०२ गुणांसाठी ०३ प्रश्न विचारण्यात आले होते.
  •  त्यातील प्रश्न क्र. QA3 , QA4, आणि QA5 हे तीन प्रश्न ०२-०२ गुणांसाठी होते.
  •  पण या तीनही प्रश्नाची केवळ उत्तरे छापली गेली आहेत आणि प्रश्न छापण्यात आलाच नाही. 
  • सदरची चुक ही परिक्षा मंडळाची (Maharashtra 12th HSC Board) असल्याने विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे ६ गुण दिले जाणार आहेत.अशी माहिती समोर आली आहे.

Maharashtra 12th HSC Board Marathi Question Paper 2023, 2022 PDF DOWNLOAD

या प्रकरणावरून शिक्षण विभागाचे उत्तर काय?

या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना शिक्षण विभागाने सांगितले की, ही चूक परिक्षेच्या दरम्यान लक्षात आली आहे तेव्हा विद्यार्थ्यांना या प्रश्नासाठी शाळांना उच्च माध्यमिक मंडळाशी पत्रव्यवहार करावा लागणार आहे. त्यानंतरच परिक्षा मंडळ यावर जो निर्णय घेनार त्याप्रमाणे पुढील योग्य ती कारवाई केली जाणार आहे.

तसेच  शिक्षण विभागातील काही तज्ञ शिक्षकांनी यावर प्रकरणावर मत देताना सांगितले की, अशा परी-स्थितीत चूक ही बोर्डाची असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सरळ गुण दिले जाऊ शकतात. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना बोर्डाच्या घोडचूकीमुळे ०६ गुण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Post a Comment

0 Comments