सरकारी कर्मचऱ्यांसाठी आनंदची बातमी! सातव्या वेतन आयोगाचा 4 था हप्ता प्रदान करणेबाबत शासन निर्णय जाहीर ..या तारखेला रोखीने मिळणार

सातव्या वेतन आयोगाचा 4 था हप्ता प्रदान करणेबाबत शासन निर्णय जाहीर ..या तारखेला रोखीने मिळणार ! 

7th pay commission 4th Installment GR Update 202

7th pay commission 4th Installment GR Update 2023:

    राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचान्यांना देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्यांचे प्रदान करण्याबाबत.दिनांक : २४ मे २०२३ रोजी महाराष्ट्र शासन वित्त विभागशासन निर्णय जारी करण्यात आली आहे.

शासन अधिसूचना वित्त विभाग, दिनांक ३० जानेवारी २०१९ अन्वये ७ च्या वेतन आयोगाची थकबाकी सन २०१९-२० पासून पुढील ५ वर्षांत ५ समान हप्त्यांत कर्मचान्याच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचान्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची कार्यपद्धती शासन परिपत्रक वित्त विभाग, दिनांक २० फेब्रुवारी, २०१९ अन्वये विहित केली आहे. तसेच राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या कर्मचा-यांच्या थकबाकीची रक्कम ५ वर्षात ५ समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक ३० मे २०१९ अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

तसेच निवृत्तिवेतनाच्या थकबाकीची रक्कम ५ वर्षांत ५ समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याचे दिनांक २४ जानेवारी २०१९ आणि दिनांक १ मार्च, २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये आदेशित केले आहे.

राज्यात को ि१९ (कोरोना) या विषाणुच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यामुळे राज्याच्या महसूली जमेवर झालेला प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन शासन निर्णय वित्त विभाग, दिनांक ०९ मे २०२२ अन्वये राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना दिनांक १ जुलै २०२१ रोजी देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या बाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे प्रदान दिनांक ०९ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्दये करण्यात आले आहे. वसेब या शासन निर्णयामध्ये उर्वरीत देय असलेल्या हप्त्यांचे प्रदान करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता.

वरील पार्श्वभूमीवर चकाकीच्या चर्मरीत हप्त्यांच्या प्रदानासंबंधीचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

👉👉👉शासन निर्णय येथे डाऊनलोड करा 👈👈👈

शासन निर्णय-

शासन आता असे आदेश देत आहे की, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै २०२२ रोजी देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या ४ थ्या हप्त्यांची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करावी:-

(अ) निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या ४ थ्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२३ च्या निवृत्तिवेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी.

(ब) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या ४ थ्या हप्त्याची रक्कम माहे जून २०२३ च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी,

(क) सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या ४ थ्या हप्त्याची रक्कम माहे जून २०२३ च्या च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी.

👉👉👉सविस्तर माहितसाठी शासन निर्णय येथे डाऊनलोड करा👈👈👈

Post a Comment

0 Comments