Talathi Bharti 2023 Press Note Download | तलाठी भरती परीक्षा २०२३ मधे २००+ गुण मिळवलेले उमेदवार बाबत स्पष्टीकरण
तलाठी भरती परीक्षा २०२३ दिनांक १७/०८/२०२३ ते १४/०९/२०२३ या कालावधीमध्ये ३ भागात एकूण ५७ सत्रामध्ये घेण्यात आली आहे. सदर परीक्षेस महाराष्ट्र भरातून जिल्हानिहाय तलाठी पदासाठी एकूण १०,४१,७१३ परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. सदर उमेदवारांपैकी ८,६४,९६० उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. परिक्षेनंतर सदर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्न उत्तराबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे TCS कंपनीने तीन वेळा शंकासमाधान (एकूण १४९ प्रश्नांचे) केले आहे. दिनांक ०४/०१/२०२४ अखेर शंका समाधान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
त्यानंतर टीसीएस कंपनी द्वारे तलाठी भरती जाहिरातीमध्ये प्रथमतः प्रसिद्ध केल्यानुसार ५७ सत्रांमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे ५७ प्रश्न पत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तरांच्या गुणांवर गुण सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सदर गुण सामान्यीकरण पद्धती www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर दिनांक २७/०९/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दिनांक ०५/०१/२०२४ रोजी या सामान्यीकरण केलेल्या गुणानुसार उमेदवारांना मिळालेले सामान्यीकृत गुण (Talathi Bharti 2023 normalised score) www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर तलाठी भरती पोर्टल टॅब वर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
👉Talathi Bharti 2023 Press Note Download Here सदरची प्रेस नोट राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईट सुधा उपलब्ध आहे.
👉जिल्हानिहाय गुणवत्ता यादी येथे पहा
दिनांक ०७/०१/२०२४ रोजी काही वृत्तपत्र व दूरचित्रवाहिनी माध्यमातून या सामान्यीकृत गुणाबाबत बातमी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की, सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात. तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत.
सामान्यीकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरु करण्यात येईल तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थीच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही.
सदर परीक्षा TCS कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली असून जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी परीक्षा देत असतात व त्यामुळे सत्र संख्या अधिक असते त्या त्या वेळेला सामान्यीकरण प्रक्रिया करणे भाग पडते. कारण वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सत्रात घेतलेल्या प्रश्नांची काठिण्य पातळी विचारात घेता उमेदवारांवर अन्याय न करता सर्व उमेदवारांना एकच मोजमाप लावणेसाठीची हि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. गुण सामान्यीकरणची ही कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या परीक्षांमध्ये जसे की रेल्वे भरती बोर्ड, एस एस सी, म्हाडा इत्यादी मध्ये नोकर भरतीसाठी यापूर्वी वापरण्यात आली आहे.
सदर 'गुण सामान्यीकरण' www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर दिनांक २७/०९/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तथापि परीक्षेतील या प्रक्रियेबाबत अनभिज्ञता असल्या कारणाने काही वृत्त पत्र/दूरचित्रवाणी माध्यमातून सामान्यीकरण गुणाबाबत बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. गुण सामान्य करण प्रक्रिया ही अनेक सत्रात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी अत्यावश्यक असल्याने कोणत्याही उमेदवारावर अन्याय न होण्यासाठी ती तलाठी भरती परीक्षेसाठी पार पाडण्यात आली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
'तलाठी भरती परीक्षेमध्ये २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळालेल्या उमेदवारांची यादी*
येथे साविस्तर वाचा आणि डाउनलोड करा- Read Also: पर्सनल लोन घेताना या 05 गोष्टी लक्षात ठेवा मिळेल लाखाचे लोन !
- Read Also : तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? असं चेक करा!
काही महत्त्वाच्या लिंक्स
- Educational Notes
- 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी 20 हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार अर्ज सुरू | Vidyadhan Scholarship 2024
0 Comments