MahaIT पोलीस भरतीचे वेळापत्रक बदलले! पोलीस आयुक्तांचा निर्णय, नवीन तारीख काय?

 पोलीस भरतीचे वेळापत्रक बदलले! पोलीस आयुक्तांचा निर्णय, नवीन तारीख काय? (Maharashtra police Bharti 2024 Update )


Maharashtra Police Recruitment 2024 :

   राज्यभरात पोलीस भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे परंतु काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेआहेत.

नवी मुंबई पोलीस भरती 2024:-

    नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 185 पोलीस शिपाई रिक्त पदांची प्रवर्ग निहाय भरती प्रक्रिया सुरु होणार होती परंतु काल पासून पडत असलेल्या पावसामुळे मैदान चाचणी घेण्यायोग्य नसल्याने सदर भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेली आहे याबाबत सर्व उमेदवार यांना माहिती असणे आवश्यक आहे. आज भरती प्रक्रियेसाठी आलेल्या आणि उद्या येणाऱ्या उमेदवारांची चाचणी 23 जून रोजी होणार आहे. तर 21 जून आणि 22 जून रोजी जे उमेदवार येणार होते त्यांची मैदानी चाचणी ही  27 जून 2024 रोजी घेण्यात येणार. आहे. अशी माहिती पोलीस मुख्यालय उपायुक्त संजय पाटील यांनी याबाबत माहिती दिली.

पोलीस भरतीच्या या वेळापत्रकामधील हा बदल नवी मुंबई मध्ये होणाऱ्या भरतीबाबत घेण्यात आला आहे. कारण उमेदवारांना भरती देताना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. इतर ठिकाणी नियोजनाप्रमाणे भरती प्रक्रिया सुरू आहे.


Post a Comment

0 Comments