कारागृह उपमहानिरीक्षक, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर आस्थापनेवरील कारागृह शिपाई भरती- २०२२-२३ ची तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी प्रसिध्दी बावत.
Chhatrapati Sambhaji Nagar prison Police merit list 2023
१. कारागृह उपमहानिरीक्षक, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर आस्थापनेवरील कारागृह शिपाई भरती- २०२२-२३ च्या जाहिरातीमध्ये प्रसिध्द केल्याप्रमाणे ३१५ रिक्त पदांकरिता घेण्यात आलेली मैदानी चाचणी, लेखी परिक्षेमध्ये उमेदवारांना प्राप्त गुणांच्या आधारे शासन निर्णयानुसार प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी या सोबत जोडुन www.aurangabadcitypolice.gov.in या संकेतस्तळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Prison Constable Recruitment 2022-2023
२. प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी बाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे आक्षेप हरकती असल्यास, त्यांचे आक्षेप समक्ष लेखी स्वरुपात अववा या कार्यालयाचा ई-मेल आयडी ep. aurangabad@mahapolice.gov.in यर दि. ०१/१२/२०२४ रोजी १८.०० वा. पर्यंत सादर करावे. विहीत कालावधीनंतर आक्षेप हरकती प्राप्त झाल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
Karagruh police bharti 2023 (Aurangabad)
३. कारागृह शिपाई भरती सन २०२२-२३ मध्ये ज्या मराठा उमेदवारांनी आर्थिक दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गातुन आवेदन अर्ज सादर केले आहेत त्या उमेदवारांच्या बाबतीत मा.अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांचेकडील अपोमसं/प्रशिक्षण/पोशि भरती- २०२२-२३/१७३/९६६ दि. १६.७.२०२४ व दि. ३०.७.२०२४ मध्ये दिलेल्या सुचनेप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.
४. कारागृह शिपाई पदाची तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादीमध्ये सामाविष्ट असलेल्या उमेदवारांचा मुळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांच्या अधिन राहुन यादीमध्ये सामावेश केलेला आहे. मुळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे तपासणी मध्ये उमेदवार अपात्र झाल्यास किंवा प्रमाणपत्र पुर्न तपासणी मध्ये अपात्र झाल्यास त्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल. निवड रद्द झालेल्या उमेदवारांचे नाव कमी केल्यास उमेदवारांना कोणत्याही प्रकाराचा दावा करता येणार नाही.
५. कारागृह शिपाई भरती प्रक्रिये दरम्यान नियमानुसार आवश्यक ते बदल/निर्णय घेण्याचे अधिकार कारागृह शिपाई भरती निवड मंडळाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत
0 Comments