आर टी ई प्रवेश 2025-26 महाराष्ट्र करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे | RTE Admission Date 2025- 26 Maharashtra Documents required
आर टी ई प्रवेश 2025-26 महाराष्ट्र करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे | RTE Admission Date 2025-26 Maharashtra Documents required list pdf
लवकरच शैक्षणिक सत्र 2025-26 करिता आर टी ई प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. याकरिता पालकांना लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव आत्तापासूनच करावी लागणार आहे. आपण खाली पाहूया प्रवेश प्रक्रिया करिता कोण कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार रहिवाशी दाखला / वास्तव्याचा दाखला
राखीव प्रवर्गातील म्हणजेच वंचित जात संवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र , दीव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे. अर्थीक दृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक) जन्माचा दाखला / जन्म प्रमाणपत्र
RTE maharashtra 25% ऑनलाइन अर्ज कसा
करावा फॉर्म 2025 26
Maharadhtra RTE नोंदणी 2025 - 26 साठी अर्ज करण्याच्या पायऱ्याः
- सर्वप्रथम अर्जदाराला योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- आता वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर "नवीन अर्ज/ विद्यार्थी लॉगिन" या लिंकवर Start करा.
- आता एक नवीन पृष्ठ उघडेल, "नवीन नोंदणी" या लिंकवर क्लिक करा.
- आता एक नोंदणी फॉर्म उघडेल.
- नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेले सर्व तपशील भरा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सबमिट वर क्लिक करा.
- आता तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे
- वेबसाईट वर जाण्यासाठी इथे क्लिक करा
- आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.
- निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति घेऊन जाव्यात तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी काढून घ्यावी. पालकांनी आपल्या बरोबर आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.
- आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2024-25 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील परंतु पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी .
- अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.
- प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.
- निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील.
- State Summary: Total Selection : 93009 and Total Waiting Selection : 71276
0 Comments