राज्यातील या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; अखेर पेन्शन प्रणाली स्तर – 1 लागु करणेबाबत GR निर्गमित दि.04.12.2024

राज्यातील या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; अखेर पेन्शन प्रणाली स्तर – 1 लागु करणेबाबत GR निर्गमित दि.04.12.2024

State Teaching & Non Teaching Staff nps scheme

State Teaching & Non Teaching Staff nps scheme start shasan nirnay:- 

वित्त विभागाच्या दिनांक ३१ ऑक्टोबर, २००५ च्या शासन निर्णयान्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केल्याप्रमाणे दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक ९ नोव्हेंबर, २०१२ च्या शासन निर्णयान्वये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली होती, त्याच धर्तीवर दिव्यांग कल्याण विभागाच्या नियंत्रणाखालील राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (डीसीपीएस) लागू असणाऱ्या दिव्यांगांच्या अनुदानित विशेष शाळा / कर्मशाळा / मतिमंद मुलांचे बालगृहांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना १०० टक्के अनुदानित पदांवरील दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी वा तद्नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत (NPS) सामिल करण्याचा निर्णय घेऊन त्याबाबतची अंमलबजावणी करण्यासाठीची कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सबब यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे.

शासन निर्णय :-

१) दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) लागू असणाऱ्या दिव्यांगांच्या मान्यताप्राप्त व अनुदानित विशेष शाळा, कार्यशाळा व मतिमंद मुलांचे बालगृहामधील १०० टक्के अनुदानित पदांवरील शिक्षक व शिक्षकेतर पदांवर नियुक्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) लागू होईल.

२) संबंधित कर्मचाऱ्यांची नियमित / मान्यताप्राप्त पद्धतीशिवाय इतर प्रकारे (उ.दा. कंत्राटी पद्धतीने, विशिष्ट सिमित कालावधीकरीता, एखाद्या प्रकल्पाकरीता, प्रकल्पाच्या कालावधी पुरती किंवा इतर कोणत्याही अनियमित पद्धतीने) नियुक्ती झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यांस राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू राहणार नाही. संबंधित कर्मचाऱ्याची नियुक्ती ही विहित पद्धतीने, नियमित वेतनश्रेणीतील नियमित पदावर सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने झाली आहे, अशाच पदांवरील कर्मचाऱ्यांना ही प्रणाली लागू राहील. तसेच सदर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी १०० टक्के अनुदानावरील शाळेतील १०० टक्के अनुदानीत नियमित ..

Post a Comment

0 Comments